शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सांगली, मिरजेत ८६ सीसीटीव्ही कॅमेरे! सुहेल शर्मा , १ मे रोजी कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 23:18 IST

सांगली : सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील गुन्हेगारीला आळा बसावा व वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस दलाने या तीनही शहरात अत्याधुनिक ८६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

ठळक मुद्देगुन्हेगारीस आळा बसविण्यासाठी उपाययोजना

सांगली : सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील गुन्हेगारीला आळा बसावा व वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस दलाने या तीनही शहरात अत्याधुनिक ८६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. १ मेपासून हे कॅमेरे कार्यान्वित केले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी गुरुवारी दिली. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सिग्नल यंत्रणा आणखी सक्षम केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

शर्मा म्हणाले, पोलीस कर्मचाऱ्यांच्याही अडचणी असतात. त्या अडचणी त्यांनी मांडाव्यात, यासाठी ‘समाधान हेल्पलाईन’ ही सेवा सुरु केली आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी खबºयांचे नेटवर्क अधिक बळकट केले जात आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सिग्नल बसविले आहेत. आता विजयनगर व राजवाडा चौक येथेही सिग्नल बसविला जाणार आहे. लहान मुलांना वाहन चालविण्यास दिल्याप्रकरणी आतापर्यंत शंभर पालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. शहरात नव्याने चार ते पाच पोलीस चौक्या उघडल्या जाणार आहेत. सध्या शंभरफुटी रस्त्यावर चौकी सुरु केली आहे. अपघात कुठेही झाला तर जखमींना मदत करणे प्रत्येकाचे काम आहे. नागरिकांनी जखमींना मदत करावी, त्यांना पोलिसांकडून कोणताही त्रास दिला जाणार नाही.

शर्मा म्हणाले, पोलिसांची वाहने कुठे आहेत, याची तपासणी करण्यासाठी १ मेपासून वाहनांना जीपीएस ही यंत्रणा बसविली जाणार आहे. पोलीस ठाण्यांची वाहने कुठे आहेत? ती काय करीत आहेत? याची सहजपणे माहिती मिळेल. तसेच एखादी घटना घडली आहे आणि त्याच भागात दुसºया पोलीस ठाण्याचे वाहन कामानिमित्त गेले असेल, तर त्यांना कॉल करुन घटनास्थळी पाठविता येणार आहे.

पासपोर्ट काढताना पडताळणीसाठी लोकांना पोलीस ठाण्यात जावे लागत होते. लोकांचा हा त्रास कमी करण्यासाठी आता पोलीसच संबंधित लोकांच्या घरी जाऊन पडताळणीचे काम करीत आहेत. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात हा प्रयोग सुरु केला आहे.वाढदिनी सुटीशर्मा म्हणाले, पोलिसांना अनेकदा २४ तास ड्युटी करावी लागते. साप्ताहिक सुटी व रजांना मुकावे लागते. सण, उत्सव तसेच स्वत:चा वाढदिवस व लग्नाचा वाढदिवसही त्यांना साजरा करता येत नाही. त्यामुळे आता वाढदिनी व लग्नाच्या वाढदिवसाला पोलिसांना सुटी जाहीर केली आहे. त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीPolice Stationपोलीस ठाणे